कर्जत-खालापुरात आदित्य ठाकरे यांची आज परिवर्तन सभा

कर्जत-खालापुरात आदित्य ठाकरे यांची आज परिवर्तन सभा

स्थळ : मोहोपाडा – अचानक मैदान. वेळ – सायंकाळी 5.30 खोपोली – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक. वेळ – सायंकाळी 7

चौक – विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराचा झंझावात सध्या संपूर्ण राज्यात सुरू आहे. या सभांना प्रचंड गर्दी होत असून आदित्य ठाकरे यांची परिवर्तन सभा उद्या गुरुवारी कर्जत-खालापुरात होणार आहे. या सभेची जय्यत तयारी झाली असून आदित्य ठाकरे विरोधकांवर काय टीका करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या प्रचारासाठी गुरुवारी मोहोपाडा येथील अचानक मैदानावर सायंकाळी 5.30 वाजता आदित्य ठाकरे यांची परिवर्तन सभा होणार आहे. त्यानंतर कर्जत-खालापूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारासाठी खोपोलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात सायंकाळी सात वाजता परिवर्तन सभा होणार असून ही सभा प्रचंड गर्दीची ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;