गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आग; स्फोटाचा थरारक व्हिडीओ व्हायरल

गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आग; स्फोटाचा थरारक व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात बुधवारी रात्री धक्कादायक घटना घडली असून एक मोठी दुर्घटना घडली आहे. गर्भवती महिलेला रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकेला आग लागून ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने यात जिवितहानी झालेली नाही.

महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात बुधवारी रात्री एक रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. या अपघातात गर्भवती महिला आणि तिचे कुटुंब सुदैवाने बचावले. रुग्णवाहिका, गर्भवती महिला आणि तिचे कुटुंबाला एरंडोल सरकारी रुग्णायातून जळगाव रुग्णालयात नेत होते. दरम्यान रुग्णवाहिका चालकाला गाडीच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे दिसले. तो तत्काळ गाडीतून उतरला. त्याने महिलेसह तिच्या कुटुंबियांनाही गाडीतून उतरवले आणि लोकांना गाडीपासून दूर व्हायला सांगितले. त्यानंतर बघता बघता संपूर्ण गाडीला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग ऑक्सिजन सिलेंडरपर्यंत पोहोचली आणि स्फोट झाला. स्फोट इतका जबरदस्त होता की, लोकांच्या घराच्या काचा फुटल्या. मिळालेल्या माहितीनुसार, दादावाडी परिसराजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला आहे.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;