पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्यानंतर सिद्धूंना सोडावा लागला कपिलचा शो; आता म्हणाले “सरदारच पाहिजे..”

पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्यानंतर सिद्धूंना सोडावा लागला कपिलचा शो; आता म्हणाले “सरदारच पाहिजे..”

पाच वर्षांनंतर नवज्योत सिंग सिद्धू हे कॉमेडियन कपिल शर्माच्या शोवर परतले आहेत. नुकताच या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या पाच वर्षांपासून या शोमध्ये अभिनेत्री अर्चना पूरण सिंह प्रमुख पाहुणी म्हणून दिसली. मात्र आता अचानक तिच्या खुर्चीवर नवज्योत सिंग सिद्धू यांना पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या एपिसोडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या खास एपिसोडमध्ये नवज्योत सिंग सिद्धू हे त्यांची पत्नी आणि क्रिकेटर हरभजन सिंग यांच्यासोबत पोहोचले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये सिद्धू त्यांच्याच अंदाजात कपिलला म्हणतात, “अब मोटरसायकल नहीं, कार चाहिये, अबे ऑडियन्स सारी कह रही है की सरदार चाहिए (आता मोटरसायकल नको, कार पाहिजे, प्रेक्षक म्हणतायत की आता त्यांना सरदार पाहिजे). आपण शोमध्ये परत यावं अशी मागणी प्रेक्षकांकडून होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. हे ऐकल्यानंतर कपिल जोरात हसतो. या व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांनीही ‘सिद्धूंना परत आणा’ अशी मागणी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

2013 मध्ये कलर्स टीव्हीवर जेव्हापासून कपिल शर्माचा कॉमेडी शो सुरू झाला, तेव्हापासून नवज्योत सिंग सिद्धू या शोचा भाग होते. मात्र 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यावरून केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे त्यांना हा शो सोडावा लागला होता. त्यावेळी सिद्धू म्हणाले होते, “हे (दहशतवादी हल्ला) भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे आणि मी त्याचा तीव्र निषेध करतो. हिंसा नेहमीच निषेधार्ह असते आणि ज्यांनी ती केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण मूठभर लोकांसाठी तुम्ही संपूर्ण देशाला दोष देऊ शकता का? एखाद्या व्यक्तीला तुम्ही दोष देऊ शकता का?” सिद्धूंच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते. अनेकांनी त्यावेळी ‘द कपिल शर्मा शो’वर बंदी आणण्याची मागणी केली होती. ‘बॉयकॉट सिद्धू’ असा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. या वादानंतर कपिल शर्माच्या शोमध्ये सिद्धूंची जागा अर्चना पुरण सिंगने घेतली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;