अज्ञात दुचाकीस्वाराचा धक्का अन् अज्ञात चार चाकी अंगावरून गेली; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

अज्ञात दुचाकीस्वाराचा धक्का अन् अज्ञात चार चाकी अंगावरून गेली; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बाजूने जाणाऱया अज्ञात दुचाकीस्वाराचा धक्का लागल्याने संतोष बामणे (37) हा दुचाकीस्वार रस्त्यातच आडवा पडला. तेवढय़ात मागून आलेले चार चाकी वाहन संतोषच्या अंगावरून गेले. यात गंभीर जखमी झालेल्या संतोषचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पवई येथे घडली.

दिवा येथे राहणारा संतोष बामणे हा तरुण त्याच्या दुचाकीवरून पवईच्या हिरानंदानी येथून कामावरून घराकडे निघाला होता. तो गांधीनगर जंक्शन येथे आला असता बाजूला असलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराचा त्याला धक्का लागला. परिणामी दोघेही दुचाकीस्वार रस्त्यातच आडवे पडले. त्याच वेळी मागून आलेले चार चाकी वाहन संतोषच्या कंबरेवरून गेले. दोघेही चालक संतोषला मदत न करता पळून गेले. नागरिक व पोलिसांनी संतोषला गंभीर जखमी अवस्थेत शीव इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना संतोषचा मृत्यू झाला. या प्रकरणी पार्क साईट पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वार व चारचाकी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;