सेनादल 6 बाद 192

सेनादल 6 बाद 192

धुके आणि अंधुक प्रकाशामुळे केवळ 64 षटकांच्या झालेल्या सामन्यात सलामीवीर शुभम रोहिल्ला आणि मोहित अहलावत यांनी केलेल्या 110 धावांच्या भागीमुळे सेनादलाने रणजी सामन्यात पहिल्या दिवसअखेर 6 बाद 192 अशी मजल मारली. खेळ थांबला तेव्हा पुलकीत नारंग (6) आणि वरुण चौधरी (0) खेळत होते.

गेल्या सामन्यात बोनस गुणासह विजय मिळवणाऱया मुंबईने आज टॉस जिंकून सेनादलाला फलंदाजी दिली आणि मुंबईच्या गोलंदाजांनी आघाडीच्या अंशुल गुप्ता (6), रवी चौहान (4) आणि अर्जुन शर्मा (7) यांची विकेट घेत सेनादलाची 3 बाद 30 अशी अवस्था केली होती. मात्र सलामीवीर शुभम रोहिल्लाने कर्णधार रजत पालीवालसोबत संघाची पडझड रोखली. दोघांनी 42 धावांची भर घातली.

72 धावांत 4 फलंदाज बाद झालेल्या सेनादलाच्या डावाला बळकटी दिली. सलामीवीर रोहिल्ला आणि अहलावतने. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 110 धावा जोडल्या. शम्स मुलानीने अहलावतला बाद करत जोडी फोडली आणि मग हिमांशू सिंगने रोहिल्लालाही बाद केले. त्याने 183 चेंडूच्या चिवट खेळीत 56 धावा केल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;