‘उद्या दाऊदही आला तर त्यालाही पक्षात घेतील’, नाना पटोले यांनी भाजपला केलं लक्ष्य

‘उद्या दाऊदही आला तर त्यालाही पक्षात घेतील’, नाना पटोले यांनी भाजपला केलं लक्ष्य

यांचा (भाजप) सत्ता जिहाद सुरू आहे. उद्या दाऊदही यांच्या पक्षातून उभा राहिला तर सत्तेसाठी हे त्यासाठीही तयार होतील, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. नागपूरमध्ये एका प्रचारसभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, नाना पटोले म्हणाले की, ”नवाब मलिक यांच्याबद्दल भाजपने जनतेला सांगावं. ज्यांचे दाऊदशी संबंध होते आणि ज्यांना तुम्ही 17 महिने तुरुंगात ठेवलं. तेच आज तुमचे उमेदवार आहेत.”

याआधी नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वक्तव्य केलं होतं. अकोल्यातील भाषणात ते म्हणाले होते की, भाजपच्या नेत्यांनी ओबीसी समाजाला कुत्र्याची उपमा दिली, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचा अपमान करून अजूनही फडणवीसांनी माफी मागितलेली नाही. म्हणून भाजपलाच आता कुत्रा बनवण्याची वेळ आलेली आहे.”

ते म्हणाले, ”नरेंद्र मोदींनी यवतमाळ जिल्ह्यात येऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, अजूनही ते प्रत्यक्षात उतरलेले नाही. आरक्षण देऊ असे सांगत बंजारा समाजाची फसवणूक केली आणि आता सोंगाडे बनून फक्त मत मागत फिरत आहेत.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;