बंगालमध्ये टीएमसी नेत्याची गोळी घालून हत्या, गोळीबारानंतर बॉम्बही फेकला; अनेक जण जखमी

बंगालमध्ये टीएमसी नेत्याची गोळी घालून हत्या, गोळीबारानंतर बॉम्बही फेकला; अनेक जण जखमी

पश्चिम बंगालमधील परगना जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याची बुधवारी अज्ञात आरोपींनी गोळी घालून हत्या केली. अशोक शॉ असे मयत नेत्याचे नाव आहे. शॉ हे जगतदल वॉर्ड नंबर 12 चे तृणमूल काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. जगतदल पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना घडली. गोळी मारल्यानंतर आरोपींनी अशोक यांच्यावर बॉम्ब फेकला.

स्थानिक लोकांनी अशोक यांना तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बॉम्बस्फोटात काही नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच बॅरकपूर पोलीस आयुक्त आलोक राजोरिया पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. संशयित आरोपींना ताब्यात घेत चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;