माजी आमदारानं सोडली भाजपची साथ; शिवशरण बिराजदार पाटील शिवबंधनात!

माजी आमदारानं सोडली भाजपची साथ; शिवशरण बिराजदार पाटील शिवबंधनात!

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाला सोलापूरमध्ये धक्का बसला आहे. दक्षिण सोलापूरचे माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यामुळे दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे.

शिवसेनेमध्ये प्रवेश करताच शिवरशरण पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपमध्ये गेलो, ती माझी वाट चुकली होती. मी माझ्या घरी परत आलो, याचा आनंद होत आहे. शिवसेना प्रमुखांनी मला ताईत घातले होते आणि आज उद्धव साहेबांनी माझ्या हातात शिवबंधन बांधले, असले ते म्हणाले.

सोलापूरचे दोन्ही आमदार कामाचे नसून त्यांनी शहर भकास केले. दोन्ही देशमुखांच्या भांडणामध्ये शहर भकास झाले. आता दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेचे आमदार करणअयासाठी मी इथे आलो असून माझा प्राण असेपर्यंत जनतेची सेवा करत राहणार, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;