भाजपच्या प्रचारसभेत मिथुन चक्रवर्ती यांच्या पाकिटाची चोरी; मंचावरूनच चोराला केलं आवाहन

भाजपच्या प्रचारसभेत मिथुन चक्रवर्ती यांच्या पाकिटाची चोरी; मंचावरूनच चोराला केलं आवाहन

महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्येही लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील निरसा विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार अपर्णा सेनगुप्ता यांना तिकिट देण्यात आलंय. त्यांच्या प्रचारासाठी बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती मंगळवारी या मतदारसंघात पोहोचले होते. अपर्मा सेनगुप्ता यांचा प्रचार करण्यासाठी याठिकाणी मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सभेच्या ठिकाणच्या गर्दीचा फायदा घेत मिथुन चक्रवर्ती यांचं पाकिट एकाने चोरलं. सहसा गर्दीच्या ठिकाणी पाकिटमारच्या घटना अनेकदा घडताना दिसतात. पण प्रचारासाठी आलेल्या मोठ्या सेलिब्रिटीचंच पाकिट चोरीला गेल्याची अजब घटना या मतदारसंघात घडली.

मिथुन चक्रवर्ती सभेला येणार कळताच त्याठिकाणी हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कोणतीच व्यवस्था तिथे नव्हती. पुरेशा सुरक्षा व्यवस्थेअभावी लोकांची गर्दी मंचापर्यंत पोहोचली होती. अनेकांनी मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांच्या अवतीभवती घोळका केला. याच गर्दीचा फायदा घेत चोराने त्यांचं पाकिट चोरलं. मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या खिशात पाकिट नसल्याचं जेव्हा समजलं, तेव्हा त्यांनी मंचावरील भाजपच्या नेत्यांना त्याविषयीची माहिती दिली. यानंतर भाजप नेत्यांनी पाकिट चोरणाऱ्याला ते परत देण्याचं आवाहन केलं. मात्र आवाहन करूनही मिथुन दा यांचं पाकिट परत मिळालं नाही. अखेर ते कार्यक्रम लवकर संपवून तिथून निघाले.

या सभेतला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून झारखंड मुक्ती मोर्चाने भाजपची खिल्ली उडवली. ‘प्रिय भाजप समर्थकांनो, किमान तुमच्या स्वत:च्या नेत्यांना तरी सोडा. मिथुन चक्रवर्ती हे भाजपच्या प्रचारासाठी तिथे आले होते आणि कोणीतरी त्यांचं पाकिट चोरलं. काय भन्नाट कुटुंब आहे’, असं ट्विट त्यांच्या पेजवरून करण्यात आलं आहे.

याआधी सोमवारी मिथुन चक्रवर्ती यांनी सोमवारी झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यात भव्य रोड शोचं नेतृत्व केलं होतं. त्यांनी पोटका मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या पत्नी आणि भाजप उमेदवार मीरा मुंडा यांच्यासाठी प्रचार केला होता. मिथुन गा यांना नुकताच भारतातील सर्वोच्च चित्रपट पुरस्कार ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपसाठी प्रचार करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;