“पोलिसांनी मला तिच्या घराजवळ..”; ऐश्वर्याच्या घराबाहेरील गोंधळानंतर जेव्हा सलमानने केला खुलासा

“पोलिसांनी मला तिच्या घराजवळ..”; ऐश्वर्याच्या घराबाहेरील गोंधळानंतर जेव्हा सलमानने केला खुलासा

अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जातंय. या चर्चांदरम्यान अभिषेकचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जातंय. अशातच सोशल मीडियावर काही जुन्या मुलाखती पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. 1999 ते 2002 दरम्यान ऐश्वर्या आणि सलमान खानचं रिलेशनशिप सर्वाधिक चर्चेत होतं. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र या नात्यात अनेक वादही झाले. ऐश्वर्याने सलमानवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारायला मंचावर जाते. यावेळी तिच्या हातावर जखमेची पट्टी दिसून येत आहे. डोळ्याजवळ लागलेला मार तिने गॉगलने झाकला आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. ‘हे खूपच भयंकर आहे. जिच्यावर अन्याय झाला, ती सर्वकाही लपवून स्वत:चा बचाव करू पाहतेय आणि दोषी मोकळा फिरतोय. तिने सलमानला सोडलं ते बरं झालं’, असं एकाने लिहिलंय. तर ‘सलमान खानमुळे माझं रक्त खवळतंय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

ऐश्वर्याचा हा जुना व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सलमानच्याही एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ रेडिट युजरने शेअर केला. यामध्ये सलमान ऐश्वर्याच्या घराबाहेर घातलेल्या गोंधळाविषयी मोकळेपणे बोलताना दिसत आहे. 2002 मध्ये ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणाला, “खरंय, या सर्व बातम्या खऱ्या आहेत. पण त्यात अतिशयोक्ती आहे. मी तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पण जर तुमची भांडणं होत नसतील, तर तुमच्यात प्रेमच नाही. मी एखाद्या बाहेरच्या व्यक्तीशी भांडू शकत नाही. जी काही भांडणं किंवा अधिकार गाजवण्याची वृत्ती आहे ती माझ्याकडून आहे आणि ते सर्व प्रेमापोटी आहे. पण मी माझ्या गाडीला धडक दिली. पोलिसांनी मला तिच्या घराजवळ न जाण्याचा इशारा दिला आहे.”

2001 मध्ये सलमान रागाच्या भरात ऐश्वर्याच्या घराजवळ गेला होता आणि तिथे त्याने गोंधळ घातला होता. सलमान जोरजोरात तिच्या घराचं दार वाजवत होता, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं. जर ऐश्वर्याने दार उघडलं नाही तर छप्परवरून उडी मारून घरात शिरण्याची धमकीही सलमानने दिल्याचा दावा काहींनी केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;