स्पा सेंटरमध्ये मसाज करणे बँक कर्मचाऱ्याला महागात पडले, मदतीसाठी पोलिसात धाव

स्पा सेंटरमध्ये मसाज करणे बँक कर्मचाऱ्याला महागात पडले, मदतीसाठी पोलिसात धाव

स्पा सेंटरमध्ये जाऊन मसाज करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. मसाज करून घरी आल्यानंतर त्याला स्पा सेंटरच्या संचालिकेचा फोन आला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. स्पा सेंटरमध्ये कर्मचाऱ्याचा अश्लील व्हिडिओ बनवून त्याच्याकडे पैसे उकळण्यास सुरवात केली. अखेर कर्मचाऱ्याने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.

मेरठमधील एक बँक कर्मचारी एका स्पा सेंटरमध्ये मसाजसाठी गेला होता. स्पा सेंटरमध्ये कपडे बदलताना सीक्रेट कॅमेऱ्याद्वारे त्याचा अश्लील व्हिडिओ केला. यानंतर त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली. स्पा सेंटर संचालिकेने कर्मचाऱ्याकडून तब्बल तीन लाख रुपये उकळले. यानंतरही तिची मागणी थांबत नव्हती. पुन्हा पाच लाखांची मागणी करत होती.

तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, स्पा सेंटर संचालिका त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत होती. अखेर महिलेच्या रोजच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने पोलिसता धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;