“ब्रेकअपनंतर सिंघम अगेनच्या सेटवर अर्जुनची अवस्था…”; रोहित शेट्टीकडून खुलासा

“ब्रेकअपनंतर सिंघम अगेनच्या सेटवर अर्जुनची अवस्था…”; रोहित शेट्टीकडून खुलासा

अभिनेता अर्जुन कपूरने रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातून दमदार कमबॅक केलं. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. व्यावसायिक पातळीवर अर्जुनला जरी यश मिळत असलं तरी वैयक्तिक पातळीवर त्याच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा होत्या. अशातच ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनदरम्यान अर्जुनने ‘सिंगल’ असल्याचं जाहीर करत ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केला. आता दिग्दर्शक रोहित शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अर्जुनची काय अवस्था होती.

“आम्ही शूटिंग करत असताना अर्जुन कोणत्या गोष्टींचा सामना करत होता, हे मला नीट माहीत आहे. त्याच्या आयुष्यात एक टप्पा असाही होता जेव्हा त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नव्हते आणि लोक त्याला ट्रोल करत होते. आजकाल सोशल मीडियावर हे सगळं कशा पद्धतीने होतं, ते मी समजू शकतो. ट्रोलिंगचा सामना करणं हे आमच्यापैकी कोणालाच सोपं नाही आणि त्यातून सावरत चांगलं काम करत राहणं अवघड होऊन जातं. पण मी खुश आहे की आता लोक अर्जुनच्या कामाचं कौतुक करत आहेत. सिंघम अगेनमध्ये इतक्या कलाकारांच्या भूमिका आहेत, पण लोक अर्जुनच्या भूमिकेचा उल्लेख आवर्जून करत आहेत”, असं रोहित म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुनची मदत करण्याविषयी रोहित पुढे म्हणाला, “मी अजय सरांना गेल्या 33 वर्षांपासून ओळखतोय आणि त्याने मला लहान भावासारखं वागवलंय. तो नेहमीच माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. बॉक्स ऑफिसचे नंबर्स महत्त्वाचे असतात पण विश्वास आणि श्रद्धाही महत्त्वाची असते. आम्ही अशा इंडस्ट्रीत काम करतो, जिथे रातोरात काहीच घडत नाही. प्रत्येकजण खूप मेहनत घेतो. इथे असा कोणताच दिग्दर्शक, निर्माता किंवा अभिनेता नाही ज्याला सर्वसामान्य काम करायचं आहे किंवा ज्याला कौतुक नाही केलं तरी चालतं. कधीकधी तुम्ही पास होता किंवा कधी नापास होता. पण विश्वास खूप महत्त्वाचा असतो.”

मलायका आणि अर्जुन गेल्या सहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. ब्रेकअपच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अनेकदा अर्जुन आणि मलायका हे सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे पोस्ट लिहित होते. मात्र दिवाळीत पहिल्यांदाच अर्जुनने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला. अर्जुन मुंबईतील एका दिवाळी पार्टीत पोहोचला होता. राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या या दिवाळी पार्टीत तो ‘सिंघम अगेन’मधील अजय देवगण, टायगर श्रॉफ, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांसारख्या कलाकारांसोबत पोहोचला होता. यावेळी गर्दीतून चाहत्यांनी जेव्हा मलायकाचं नाव घेतलं, तेव्हा अर्जुनने ‘मी सिंगल आहे’ असं स्पष्ट केलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;