Akshara Singh Death Threat – भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहला जीवे मारण्याची धमकी

Akshara Singh Death Threat – भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहला जीवे मारण्याची धमकी

बॉलिवडू अभिनेता सलमान खान, शाहरुख खाननंतर आता भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह हिला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अभिनेत्रीला एका अनोळखी नंबरवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फोन करणारा तिच्याशी आक्षेपार्ह भाषेत बोलला असून त्याने 50 लाख रुपयांची खंडणीही मागितली. त्यानंतर अभिनेत्रीने दानापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

अक्षरा सिंहच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तिने तक्रारीत म्हटले आहे की, 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 12 वाजून 20 मिनीटांनी तिला दोन वेगवेगळ्या नंबरवरून कॉल आले. फोन येताच कॉलरने तिला शिवीगाळ करून धमकावले होते. दोन दिवसांत 50 लाख न दिल्यास जीवे मारण्याची धमकी फोन करणाऱ्याने दिली आहे. पोलीस स्टेशन प्रभारी प्रशांत कुमार भारद्वाज यांनी भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने तिची खंडणी मागून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेचा सध्या तपास सुरु असून फोन करणाऱ्याची ओळख पटविण्यात आली आहे.

अभिनेत्री अक्षरा सिंह भोजपुरी सिनेमात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. अक्षराने रवि किशन यांच्यासोबत सत्यमेव जयते या सिनेमातून आपल्या अभिनयाच्या कारकि‍र्दीला सुरुवात केली आहे. ‘सत्या’, ‘ताबादला’ आणि ‘मा तुझे सलाम’ आदी अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये ती दिसली आहे. तसेच तिने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. अक्षरा तिच्या दमदार अभिनय आणि गायनासाठी प्रसिद्ध आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;