Sunita Williams Health – माझी तब्येत ठिक…सुनीता विल्यम्सने तब्येतीबाबत दिली माहिती

Sunita Williams Health –  माझी तब्येत ठिक…सुनीता विल्यम्सने तब्येतीबाबत दिली माहिती

हिंदुस्थानी वंशांची अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या काही दिवसांपासून तिच्या आरोग्यामुळे चर्चेत आली असून चिंता व्यक्त केली जात होती. दरम्यान तिने स्वत: तिच्या आरोग्याबाबत दिलासादायक अपडेट दिली आहे. तिची तब्येत ठिक असून तिचा तसा फोटो येण्यामागचे कारणही सांगितले आहे.

सुनीता विल्यम्सचा नुकताच एक फोटो समोर आला होता. ज्यामध्ये सुनीता अशक्त दिसत होती. यानंतर, नासा म्हणजेच नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनला निवेदन जारी करावे लागले. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, सुनीताने तिच्या स्वास्थ्याबाबत फ्लुएड शिफ्टस सांगितले आहे. शिवाय त्यांनी तिची तब्येत बरी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी न्यू इंग्लंड स्पोर्ट्स नेटवर्कच्या क्लबहाऊस किड्स शोला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, तुम्हाला माहिती आहे का अंतराळात आमचे डोके थोडे मोठे दिसू लागते. कारण द्रव शरीरावर अधिक समान रीतीने पसरतात. सुनीता विल्यम्सने सांगितले की, ती पूर्वीसारखीच निरोगी आहे आणि अशक्त झाल्याचा दावाही तिने फेटाळला आहे. उलट बराच वेळ अंतराळात राहिल्यानंतर वजन वाढल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, ‘माझ्या मांड्या थोड्या वाढल्या आहेत, ‘आम्ही खूप स्क्वॉट्स करतो.’

Is Sunita Williams' Health Declining In Space? Here's What NASA Says -  News18

नासाचे प्रवक्ते जिमी रसेल यांनी एक निवेदन जारी केले होते, नासाच्या सर्व अंतराळवीरांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते, त्यांच्याकडे फ्लाइट सर्जन असतात जे त्यांच्यावर लक्ष ठेवतात आणि त्या सर्वांची तब्येत चांगली आहे.सुनिता विल्यम्सच्या मोहिमेत थेट सहभागी असलेल्या नासाच्या एका कर्मचाऱ्याने असा दावा केला की अंतराळवीरांचे वजन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;