इंडियन ऑईल रिफायनरीमध्ये भीषण आग, 8 कामगार भाजले; तिघांची प्रकृती चिंताजनक
On
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील इंडियन ऑईल रिफायनरीमध्ये भीषण आग लागून 8 कामगरा भाजल्याची घटना घडली आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. रिफायनरीच्या ॲटमॉस्फेरिक व्हॅक्यूम युनिट (AVU) मध्ये मंगळवारी सायंकाळी उशिरा आग लागली. रिफायनरीच्या जनसंपर्क अधिकारी रेणू पाठक यांनी घटनेची पुष्टी केली आहे.
जखमींपैकी तिघांना अपोलो रुग्णालयात तर पाच जणांना रिफायनरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. युनिट चालू करताना ही आग लागली.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List