नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंड अडकला विवाहबंधनात, अभिनेत्याने कोणासोबत केले लग्न?

नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंड अडकला विवाहबंधनात, अभिनेत्याने कोणासोबत केले लग्न?

नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली अखेर विवाहबंधनात अडकला आहे. अभिनेत्याचा लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. तो त्याच्या जोडीदारासोबत दिसत आहे. ज्यामध्ये त्याने गुलाबी रंगाची शेरवानी घातली आहे आणि डोक्यावर पगडी घातलेली आहे. या फोटोमध्ये नवविवाहित जोडपे खूप आनंदी दिसत आहे. चाहते दोघांचेही अभिनंदन करताना दिसत आहेत.

फोटोमध्ये अभिनेता हिमांश कोहली याने त्याच रंगाची पगडी घातली आहे. त्याच्या पत्नीने गुलाबी रंगाचा लेहेंगा आणि सोनेरी आणि गुलाबी मिश्रित रंगाचा दुपट्टा घेतला आहे. विशेष म्हणजे हिमांशने आपल्या पत्नीचे नाव आतापर्यंत लपवून ठेवले आहे. मात्र, लग्नातील मेहेदी कार्यक्रमादरम्यान त्याच्या हातावर व्ही लिहिलेले अक्षर मिळाले. त्यामुळे त्यांच्या पत्नीचे नाव व्ही ने सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की हिमांश कोहलीची पत्नी नॉन फिल्मी पार्श्वभूमीची आहे. त्यांचं अरेंज्ड कम लव्ह मॅरेज असल्याची चर्चा आहे. 12 नोव्हेंबरला दोघांचे लग्न झाले. याआधी मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

2018 मध्ये नेहा कक्करसोबत ब्रेकअप

नेहा कक्कर आणि हिमांश कोहली एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. पण 2018 मध्ये दोघेही वेगळे झाले. या ब्रेकअपनंतर दोघेही मोकळेपणाने बोलले. नेहाही कॅमेऱ्यासमोर अनेकदा रडली. हिमांश टीव्ही सीरियल ‘हमसे है लाइफ’मध्ये दिसला आहे. यानंतर तो ‘यारियां’, ‘जीना इस का नाम है’, ‘रांची डायरीज’, ‘दिल जो ना कह सका’मध्येही दिसला आहे. यासोबतच तो अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;