सूरज नेहमी म्हणायचा…. अखेर अंकिता असं काय बोलून गेली?

सूरज नेहमी म्हणायचा…. अखेर अंकिता असं काय बोलून गेली?

‘बिग बॉस मराठी 5’ मुळे घराघरात पोहोचलेला आणि सगळ्यांचा लाडका बनलेला सूरज चव्हाण जो की ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेताही आहे. बिग बॉस नंतर सूरजचे आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. त्याचा चाहता वर्ग अजून वाढला आहे.

suraj chavhan

अंकिताने शब्द पाळला

बिगबॉस संपल्यावर सूजरला अनेक मंडळी भेटायला आली.सूरजला अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर यांनी भाऊ मानलं होतं. जान्हवीने त्याच्या गावी जाऊन सूरजला भेट दिली होती. अंकितानेही दिलेला शब्द पाळला. अंकिता तिच्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन सूरजला भेटण्यासाठी गेली,. तो व्हिडीओसुद्धा तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

अंकिता आणि तिचा होणारा नवरा दोघेही सुरजला भेटायला थेट त्याच्या मळ्यात पोहोचले. अंकिताने एक व्हीडिओ शेअर करत सुरजसोबतची ती भेट शेअर केली आहे. यात सुरज, अंकिता, तिचा होणारा नवरा, सुरजच्या घरातले आणि इतर मंडळी शेतात गप्पा मारताना दिसतायत. तर सुरजची बहीणीने त्या सगळ्यांकरता जेवण बनवून आणलेलंही दिसलं.

‘अखेर सूरज म्हणायचा ते खरं झालं’…अंकिताने बोलून दाखवलं 

भाकरी, शेंगदाणा मिरचीची चटणी आणि बटाट्याची कापं असा जेवणाचा बेत दिसत आहे. सगळेचजण हे जेवण आनंदाने खाताना दिसतायत. सुरजच्या गावातल्या मळ्यात ते सगळे बसलेले दिसतायत. तर हा व्हिडिओ शेअर करताना अंकिताने लिहिलं, ‘बिग बॉस च्या घरात असताना सूरज नेहमी म्हणायचा माझ्या घरी चटणी भाकर खायला येशील … आणि मी “हो” अस म्हटलं की तो म्हणायचा “खरंच… अगं बाया ग“ तर ही होती आमची “अगं बाया ग Moment’.


असं म्हणत अंकिताने व्हिडीओ शेअर करत या भेटीचा आनंद व्यक्त केला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. तर यासोबतच शेअर केलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये अंकिता त्यांच्या गावातल्या मरीआईच्या देवळात दर्शन घेताना दिसत आहेत. तर नेटकरीही त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;