माझ्याकडं गृहमंत्रीपद आलं तर महायुतीचे 60 टक्के नेते गुवाहाटीला जाऊन राहतील, रोहित पवारांचा टोला

माझ्याकडं गृहमंत्रीपद आलं तर महायुतीचे 60 टक्के नेते गुवाहाटीला जाऊन राहतील, रोहित पवारांचा टोला

महाराष्ट्रात प्रचार शिगेला पोहचला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पुराव्यासह महायुतीचे भ्रष्टाचार उघड करू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी ठणकावले. तसेच माझ्याकडे गृहमंत्रीपद आलं तर महायुतीतील 60 टक्के नेते गुवाहाटीला जाऊन राहतील, असा टोलाही त्यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला.

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा कोणीही गृहमंत्री झाला तरी महायुतीतील नेत्यांचे भ्रष्टाचाराचे पुरावे देणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. सामान्य लोकांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. हा वायफळ जाणारा पैसा महायुतीचे नेते घर भरण्यासाठी वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कर्जत जामखेडमध्ये आयोजीत केलेल्या सभेत रोहित पावरांनी राम शिंदेंवरही निशाणा साधला. राम शिंदे चॅलेंज करायचे असेल कुणाला पण करा पण पवारांना करु नका असा इशारा रोहित पवार यांनी दिला. कर्जत- जामखेडमध्ये IPL च्या मॅचेस होणार का? असा सवाल राम शिंदे करतात. त्यावर रोहित पवार म्हणाले की, आम्हाला चॅलेंज करू नका, तुम्हाला IPL चे साधे तिकीट तरी मिळते का? ते पाहा असेही रोहित पवार म्हणाले.

पाच वर्षात मी या मतदारसंघात जे काम केलं तो केवळ ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है, असेही रोहित पवार म्हणाले. कर्जत- जामखेडच्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची दखल राज्याला घ्यावी लागली असेही ते म्हणाले. कर्जत- जामखेडचे वजन हे राज्यात वाढले आहे. भविष्यात कर्जत जामखेडमधूनच राज्यातील प्रमुख निर्णय घेतले जातील असंही रोहित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस पहाटे शपथविधी करतात तसेच राम शिंदेंकडे प्रवेश हे रात्रीचे होत आहेत. आम्ही दिवसा ढवळ्या काम करतो.यापुढं आम्ही गद्दारांना सोडणार नाही असेही रोहित पवार म्हणाले. माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लावला तर त्यांचे हात छाटण्याचे काम आम्ही करु असा इशाराही त्यांनी दिला.

पवार साहेबांनी 10 वर्षात काय केलं? असं केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विचारले होते. जनता 23 तारखेला दाखवून देईल की, पवार साहेबांनी काय केलं ते असेही रोहित पवार म्हणाले. महाविकास आघाडीचे 170 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. जर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या सभा वाढल्या तर 200 पर्यंत आमचे आमदार निवडून येतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;