कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? जयंत पाटील यांचा महायुतीला सवाल

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? जयंत पाटील यांचा महायुतीला सवाल

महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्राची पीछेहाट झाली. महाराष्ट्र आता दरडोई उत्पन्नात गुजरातच्याही मागे पडला आहे. महाराष्ट्र कसा मागे राहिला आणि गुजरात कसा पुढे गेला, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती देत महायुतीवर तोफ डागली. महायुती सरकारने काय काय उद्योग केले ते सांगतो. मी जेव्हा अर्थमंत्री होतो तेव्हा महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नात देशात दुसरा-तिसरा क्रमांक असायचा. गुजरात फार मागे होते. 2014 मध्ये मोदी दिल्लीत आणि फडणवीस राज्यात बसले आणि 2016 मध्ये मागे असणारे गुजरात पुढे गेले. आपण सहाव्या क्रमांकावर गेलो. आज आकडेवारी काढली तर देशात आपल्या राज्याचा अकरावा क्रमांक आहे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? असा सवाल जयंत पाटील यांनी केला. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांनी आज सभा घेतली. त्यावेळी त्यांनी महायुतीवर तोफ डागली.

गुजरातची जनता आपल्यापेक्षा श्रीमंत झाली आहे. जे राज्य गरीब होते ते मागील दहा वर्षात आपल्यापेक्षा पुढे गेले आहे. नाकर्तेपणाची भूमिका, गुजरातला घाबरण्याची भूमिका, मोदी शहांच्या समोर मान झुकवण्याची भूमिका याला कारणभूत आहे. कोणतीही गोष्ट गुजरातने हिरावून घेतल्यावर आरे ला कारे म्हणण्याची ताकत नसणारी लोकं महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला.

महायुती सरकारने महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जाताना थांबवले नाहीत. परिणामी बेरोजगारांची संख्या आपल्या राज्यात वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे यांना बोलताना मर्यादा आहेत, ते मोदी-शाह यांना दुखावू शकत नाहीत, अशी टीका पाटील यांनी केली. आपल्या सगळ्यांना लुबाडायचं काम हे सरकार करत आहे. शेतकऱ्यांना बुडवण्याचे काम मागील अडीच वर्षात महायुती सरकारने केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;