उद्धव साहेबांच्या बॅग मधून फक्त निष्ठा आणि विश्वास मिळेल, खासदार अमोल कोल्हे यांचे विधान

उद्धव साहेबांच्या बॅग मधून फक्त निष्ठा आणि विश्वास मिळेल, खासदार अमोल कोल्हे यांचे विधान

कितीही बॅग तपासा त्यातून फक्त निष्ठा आणि विश्वास मिळेल असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असा विश्वासही कोल्हे यांनी व्यक्त केला.

पत्रकारांशी बोलताना कोल्हे म्हणाले की, कितीही बॅगा तपासा त्यातून फक्त निष्ठा आणि विश्वासच सापडेल. आम्ही सुरत गुवाहाटी करुन आलेलो नाही. सुरत गुवाहाटी करुन आलेल्या आमदारांच्या गाडीत काय सापडले हे जनतेला माहीत आहे. निवडणूक आयोगाचा नियम आहे त्याला आक्षेप नाही, पण मोदी, शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्या बॅगा कधी तपासलेल्या ऐकले नाही किंवा पाहिले नाही, असा मिश्किल टोला खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीला लगावला.

नुकत्याच आलेला सर्व्हे महाविकास आघाडीच्या विरोधात आहे असा प्रश्न केला असता त्यावर कोल्हे म्हणाले की, सर्व्हे करणारी कंपनी ही गौतम आदानी यांची आहे. ते महायुतीच्या बाजूनने सर्व्हे देणार हे अपेक्षित आहे. पण जनतेने ठरवलंय की महाविकास आघाडीच्या हाती सत्ता सोपवायची त्यामुळे या सर्व्हेंना कोणी भीक घालत नाही असेही कोल्हे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;