मिंधेंना ‘गद्दार’ घोषणा झोंबली, तरुणाला दमदाटी; साकीनाका येथील व्हिडीओ व्हायरल

मिंधेंना ‘गद्दार’ घोषणा झोंबली, तरुणाला दमदाटी; साकीनाका येथील व्हिडीओ व्हायरल

शिवसेनेशी गद्दारी करून भाजपसोबत गेलेल्या मिंधे गटाला जनतेने माफ केलेले नाही. त्यांच्याविरोधातील असंतोष विविध प्रकारे बाहेर येत असल्याचे दिसत आहे. याचा अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आला आहे. प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवून एका तरुणाने गद्दार.. गद्दार… अशा घोषणा दिल्या. ही घोषणाबाजी झोंबल्याने शिंदेंनी संताप व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी साकीनाका येथे सभा झाली. ही सभा संपल्यानंतर नियोजित स्थळी निघालेल्या शिंदेंचा ताफा संतोष कटके यांनी अडवला आणि गद्दार… गद्दार… अशा घोषणा दिल्या. यामुळे तिळपापड झालेल्या शिंदेंना गाडीतून खाली उतरावे लागले. त्यांनी महाविकास आघाडीच्या जवळील कार्यालयात जाऊन दमदाटीही केली.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी संतोष कटकेला ताब्यात घेतले. दंड भरून त्याची सुटका करण्यात आली. त्यानंतर संतोष कटके यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला. संतोष कटके हे आरपीआय (आठवले गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष साधू कटके यांचे सुपुत्र आहेत. मुलासोबत त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;