उदयसिंग राजपूत यांनी गाव, खेड्यात विकासकामे केली, देवगाव रंगारीच्या कॉर्नर सभेत चंद्रकांत खैरे यांचे प्रतिपादन

उदयसिंग राजपूत यांनी गाव, खेड्यात विकासकामे केली, देवगाव रंगारीच्या कॉर्नर सभेत चंद्रकांत खैरे यांचे प्रतिपादन

शिवसेनेचे विद्यमान आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंग सरदारसिंग राजपूत यांनी गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत अथक परिश्रम केले. विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांच्या विकास निधीतून कन्नड-सोयगाव तालुक्यांतील प्रत्येक गाव, खेड्यातील विकासकामे केली आहेत. शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या उदयसिंग राजपूत यांच्या मशाल चिन्हावर मतदान करून विजयी करण्याचे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देवगाव रंगारी येथे आयोजित कॉर्नर सभेत सोमवार, 11 रोजी केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर कन्नड तालुका संपर्कप्रमुख वामन कदम, हेमंत लोखंडे, तालुका संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, तालुकाप्रमुख संजय पाटील मोटे, उपतालुकाप्रमुख गोकुळ गोरे, माजी विभागप्रमुख बबनराव मोगल, विभागप्रमुख चांगदेव सावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले, महायुतीच्या प्रचंड भ्रष्टाचाराने महाराष्ट्राचे वाटोळे केल्याचा आरोप करीत गद्दारांना कायमचे हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडीस निवडून द्यावे, असे आवाहन केले, संपर्कप्रमुख वामन कदम, डॉ. शिंदे, संजय मोटे, गोकुळ गोरे, अनिल करगळे, आकाश उबाळे यांनी कन्नड तालुक्याच्या विकासासाठी उदयसिंग राजपूत यांच्या मशाल निशाणीवर मतदान करण्याचे आवाहन केले, यावेळी उपविभागप्रमुख भारत हार्दे, शहरप्रमुख गणेश सोनवणे, सुमित बोडखे, राहुल बोरसे, नीलेश गोंधळे, मच्छिंद्र धनुरे, राजेंद्र गोरे, रमेश गोरे, भास्कर पवार, बाळू गवळी, बाळू मुळे, भावलाल मुळे, गणेश गायकवाड, जयदीप वेताळ, गणेश हार्दे आदींसह असंख्य पदाधिकारी मतदार उपस्थित होते. सूत्रसंचालन कमलाकर चौधरी यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;