राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड, चिखलीची सभा रद्द; व्हिडीओ शेअर करत दिला महत्त्वाचा संदेश

राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड, चिखलीची सभा रद्द; व्हिडीओ शेअर करत दिला महत्त्वाचा संदेश

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सभांचा झंझावात सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. आजही राहुल गांधी यांची बुलढाण्यातील चिखली आणि गोंदिया येथे सभा होती. मात्र राहुल गांधी यांची चिखलीतील सभा रद्द झाली आहे.

राहुल गांधी यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज बुलढाण्यातील चिखली येथे जाहीर सभा होणार होती. मात्र ही सभा रद्द झाली आहे. राहुल गांधी यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते या सभेला पोहोचू शकणार नाहीत. त्यांच्याऐवजी प्रभारी रमेश चेन्नीथला आणि सचिन पायलट हे चिखलीमध्ये सभा घेतली. तर राहुल गांधी हे दुसऱ्या विमानाने थेट गोंदियाला पोहोचतील आणि संबोधित करतील. याच संदर्भात राहुल गांधी यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे.

राहुल गांधी यांनी चिखलीसह महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. ‘मला आज चिखलीला यायचे होते. तिथे सोयाबीन शेतकऱ्यांची भेट घेऊन सभेला संबोधित करायचे होते. मात्र विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मला पोहोचता आले नाही’, असे म्हणत राहुल गांधी यांनी माफी मागितली.

महाराष्ट्रातील शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहेत. भाजप सरकार सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देत नाही. मात्र इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर तुम्हा सर्वांची काळजी घेऊ आणि समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;