मुलुंडमधील पक्षी उद्यानात होणार 18 प्रजातींच्या 206 देशी-विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट

मुलुंडमधील पक्षी उद्यानात होणार 18 प्रजातींच्या 206 देशी-विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट

मुंबई महानगरपालिका मुलुंडमध्ये लवकरच अद्ययावत आणि भव्य पक्षी उद्यान उभारणार असून या ठिकाणी तब्बल 18 प्रजातींच्या 206 पक्ष्यांचा किलबिलाट मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. उद्यानाच्या उभारणीसंदर्भात पालिकेने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणास तपशीलवार आराखडा सादर केला असून लवकरच हे पक्षी उद्यान उभे राहणार आहे. या पक्षी उद्यानात आशियाई, आफ्रिकी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी पक्ष्यांची क्षेत्रवार विभागणी असणार आहे.

बृहन्मुंबई पालिकेच्या योजनेनुसार मुलुंड पक्षी उद्यान हे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय (भायखळा) प्राणी संग्रहालयाचे उपकेंद्र असणार आहे. मुलुंड (पश्चिम) येथील भूखंड क्रमांक 706 ब/ड आणि 712/अ वरती हे पक्षी उद्यान उभारण्यात येणार असून याचे क्षेत्रफळ 17 हजार 958 चौरस मीटर आहे. पक्षीगृहासाठी 10 हजार 859 चौरस मीटर आणि खेळांसाठी 3 हजार 728 चौरस मीटर क्षेत्र या उद्यानात राखीव असणार आहे. प्रत्येक पक्ष्याच्या प्रजातींचे निवासस्थान उभारण्यात येणार आहे. हे उद्यान 110 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या भायखळा प्राणीसंग्रहालयानंतर मुलुंडमधील बर्ड पार्क हे मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील सर्वात मोठे पर्यटकांचे आकर्षण असेल. मुंबईच्या उपनगर भागात आणि एमएमआर प्रदेशात राहणाऱया पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणी असेल.

हे पक्षी येणार

रेड ब्रेस्टेड पॅराकीट, ब्लॉसम हेडेड पॅराकिट, व्हाईट पिकॉक, मलबार ग्रे हॉर्नबिल, ब्लॅक हंस, ब्लॅक मुनिया, कोकाटू गालाह, ओस्ट्रिचेस, स्कॉलेट या काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या दुर्मिळ 18 प्रजातींचे 206 पक्षी येथे पाहता येणार आहेत.

संवाद, कार्यक्रम, कार्यशाळा, तज्ञांची व्याख्याने पक्षीगृहात प्रवेश करण्यापूर्वी मोठ्या धबधब्यासह येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची पालिकेची योजना आहे. तसेच पक्ष्यांना येथे खुले प्लाझादेखील असणार आहेत. या पक्षी उद्यानात संवादात्मक कार्यक्रम, कार्यशाळा आणि पक्षी तज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;