निवडणुकीनंतरच ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा बोनस, प्रशासनाच्या दिरंगाईचा 27 हजार कर्मचाऱ्यांना फटका

निवडणुकीनंतरच ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा बोनस, प्रशासनाच्या दिरंगाईचा 27 हजार कर्मचाऱ्यांना फटका

‘बेस्ट’च्या 27 हजार कर्मचाऱ्यांना 29 हजार रुपये बोनस (सानुग्रह अनुदान) देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून 80 कोटी रुपये दिले असले तरी कर्मचाऱ्यांना हा बोनस आता विधानसभा निवडणुकीनंतरच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी ‘बेस्ट’ प्रशासनाला निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी मिळाली नसल्यामुळेच हा पेच निर्माण झाल्याचे समजते. दरम्यान, ‘बेस्ट’ प्रशासनाच्या दिरंगाईमुळेच ही नामुष्की ओढवल्याचा आरोप ‘बेस्ट’ कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला आहे.

‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे निवडणूक जाहीर होण्याआधी म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी बोनस मिळणे अनिवार्य होते. मात्र पालिकेकडून निधीची तरतूद केली असताना ‘बेस्ट’ प्रशासनाकडून निधी मागणीचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याने बोनस रखडल्याचे समजते. त्यामुळे एकीकडे पालिका कर्मचाऱ्यांना 29 हजार रुपये दिवाळी बोनस मिळाला असताना 27 हजार कर्मचारी मात्र हक्काच्या बोनसपासून वंचित राहिले. त्यामुळे बेस्ट कामगार सेना आणि कृती समितीची ‘बेस्ट’ महाव्यवस्थापकांशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. यानंतर बेस्ट प्रशासनाकडून  कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत ठोस आश्वासनही देण्यात आले. त्यामुळे ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र सद्यस्थितीत विधानसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने आणि ‘विशेष परवानगी’ही मिळाली नसल्याने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीनंतरच बोनस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

…म्हणूनच रखडला बोनस

गेल्या काही वर्षांपासून आर्थिक डोलारा कोलमडलेल्या  ‘बेस्ट’ला आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी अनुदान घ्यावे लागत आहे. बेस्ट कामगार सेना, कृती समितीकडून पाठपुरावा केल्यानंतर दिवाळीआधी याबाबत ‘बेस्ट’ प्रशासनाकडून पालिकेकडे निधी मिळण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावाही करावा लागतो. असा पाठपुरावा करण्यातही आला. मात्र बेस्टने पालिकेकडून वेळेत निधी घेण्याची कार्यवाही केली नसल्यानेच हा बोनस रखडल्याचा आरोप कामगार संघटनेकडून करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;