‘बटेंगे तो कटेंगे’ नको, अन्न-वस्त्र-निवारा यावर राजकारण करा – नवाब मलिक

‘बटेंगे तो कटेंगे’ नको, अन्न-वस्त्र-निवारा यावर राजकारण करा – नवाब मलिक

‘बटेंगे तो कटेंगे’सारखी विधाने चुकीची, घृणास्पद आहेत. यातून कोणताही फायदा होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या राजकारणामुळे उत्तर प्रदेशचे खूप नुकसान झाले आहे. अगदी मंदिराच्या उभारणीत उत्तर प्रदेशात भाजपचा दारुण पराभव झाला. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांवर राजकारण केले पाहिजे. लोकांच्या विकासाची चर्चा व्हायला हवी, असे खडेबोल अजित पवार गटाचे नेते आणि मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेचे उमेदवार नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले.

‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये चालेल, पण महाराष्ट्रात ती चालणार नाही. मी त्याचे समर्थन करत नाही. आमचा नारा आहे – सबका साथ सबका विकास, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या नाऱ्याला विरोध केला होता. त्यापाठोपाठ नवाब मलिक यांनीही हिंदू-मुस्लिमच्या नावावर कोणीही देशाचे विभाजन करू नये, असे मत व्यक्त करत ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून भाजपवर निशाणा साधला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;