भांडुपमध्ये उघड्या गटारात पडून चिमुकल्याचा मृत्यू; पालिकेवर ‘एफआरआर’ दाखल करण्याची मागणी

भांडुपमध्ये उघड्या गटारात पडून चिमुकल्याचा मृत्यू; पालिकेवर ‘एफआरआर’ दाखल करण्याची मागणी

भांडुप पश्चिममध्ये उघड्या गटारात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. कृष्णा ओमप्रकाश गुप्ता असे या चिमुकल्याचे नाव आहे. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे उघडय़ा गटारामुळेच ही घटना करण्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर स्थानिकांकडून पालिकेविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत असून पालिकेवर एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

भांडुप पश्चिम गावदेवी परिसरातील कृष्णा गुप्ता हा मुलगा रविवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या घरासमोर खेळत होता. खेळता खेळता अचानक तो झाकण नसलेल्या उघडय़ा गटारात पडला. या वेळी मुलगा दिसत नसल्याने कुटुंबीय आणि रहिवाशांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र तो मुलगा परिसरात आढळला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी भांडुप पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रारही दाखल केली.

पालिकेकडून मात्र संबंधित मुलगा गटारात नव्हे तर गावदेवी नाल्यात पडून मृत पावल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मोठे नाले बंदिस्त करण्याबाबतची पॉलिसी अद्याप निश्चित झाली नसल्याने मोठे नाले बंदिस्त करण्यात येत नसल्याचेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;