संजीव खन्ना देशाचे 51वे सरन्यायाधीश; सहा महिन्यांचा कार्यकाळ… अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी करणार

संजीव खन्ना देशाचे 51वे सरन्यायाधीश; सहा महिन्यांचा कार्यकाळ… अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी करणार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सोमवारी हिंदुस्थानचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला. त्यांचा कार्यकाल सहा महिन्यांचा अर्थात 13 मे 2025 पर्यंत असेल. या अवधीत ते अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांची सुनावणी करणार आहेत.

मावळते सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचा दोन वर्षांचा कार्यकाल रविवारी संपला. त्यांनी 8 नोव्हेंबर 2022 रोजी सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्वीकारली होती. ते निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्वात सिनिअर न्यायमूर्ती असलेले संजीव खन्ना यांनी नवीन सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या शपथविधी सोहळय़ाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, मावळते सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड उपस्थित होते. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना 18 जानेवारी 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती मिळाली होती. दिल्लीतील प्रतिष्ठत कुटुंबातील संजीव खन्ना यांचे वडील दिल्ली हायकोर्टात न्यायमूर्ती होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच कायद्याबाबत रुची निर्माण झाली होती.

 स्पष्ट शब्दांत निकालपत्र लिहिणारे न्यायमूर्ती म्हणून संजीव खन्ना यांची ओळख आहे. त्यांनी अनेक बहुचर्चित प्रकरणांत ऐतिहासिक निकाल दिले आहेत. त्यात व्हीव्हीपॅट, इलेक्टोरल बॉण्ड व कलम 370 अशा महत्त्वाच्या प्रकरणांचा समावेश आहे. प्रलंबित खटल्यांचा जलदगतीने निपटारा करून पक्षकारांना वेळीच न्याय देण्यावर ते भर देतात.

शिवसेना, राष्ट्रवादीच्या सुनावणीकडे लक्ष

नवीन सरन्यायाधीश खन्ना यांच्यापुढे काही महत्त्वाच्या प्रलंबित प्रकरणांची सुनावणी होईल. त्यापैकी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकांवरील सुनावणीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. त्याचबरोबर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती कायद्याला आव्हान देणाऱया याचिका, समलिंगी विवाह, वैवाहिक बलात्कार प्रकरण, वैवाहिक हक्क पुनरुजीवित करण्याची वैधता, नागरिकत्व (सुधारणा) कायदा यासारख्या महत्त्वाच्या प्रकरणांत ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;