रावसाहेब दानवे यांची मुजोरी, कार्यकर्त्याला मारली लाथ

रावसाहेब दानवे यांची मुजोरी, कार्यकर्त्याला मारली लाथ

माजी मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या मुजोरपणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते एका सामान्य कार्यकर्त्याला लाथ मारताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिंधे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी सोमवारी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या भेटीवेळी दोघ फोटो काढण्यासाठी उभे राहिले होते. तेव्हा एक सामान्य कार्यकर्ता त्यांच्या बाजूला उभा राहिला. यावेळी दानवे यांनी लाथ मारत कार्यकर्त्याला बाजूला केले. या व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

रावसाहेब दानवे यांच्या व्हायरल व्हिडिओवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला. सुषमा अंधारे यांनी एका सभेत हा व्हिडीओ दाखवला. अशा पद्धतीने हे जर लोकांना लाथा घालत असतील तर जनता यांना लाथाडल्याशिवाय राहणार नाही. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याची चळवळ म्हणजे बाबासाहेबांची चळवळ आहे. महापुरुषांनी आम्हाला मानवतेचा वसा दिलाय. भाजपने तयार केलेले हे लोक जनतेला अशा पद्धतीने वागवतात. 20 तारखेला मतदानाला जा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;