लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उद्या मंगळवारी महाराष्ट्र दौऱ्यावर

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उद्या मंगळवारी महाराष्ट्र दौऱ्यावर

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उद्या मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते दोन प्रचारसभा घेणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे काँग्रेस उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी आणि गोंदिया येथे काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहेत.

मंगळवारी सकाळी 9.30 वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने छत्रपती संभाजी नगरमध्ये आगमन होईल तिथून ते हेलिकॉप्टरने चिखली येथे पोहोचतील. दुपारी 12 वाजता ते सभेला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी ते गोंदिया येथे प्रचारसभेला संबोधित करतील व संध्याकाळी 4.50 वाजता गोंदियाहून दिल्लीकडे प्रयाण करतील.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रचार सभाही राज्याच्या विविध भागात आयोजित करण्यात आल्या आहेत. याआधी 6 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन नागपूर येथे संविधान संमेलनाला संबोधित केले होते व त्यानंतर संध्याकाळी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील प्रचारसभेत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या 5 गॅरंटी जाहीर केल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;