‘अंजीर’ मांसाहारी की शाकाहारी सुका मेवा? जाणून घ्या आहे यामागचे सत्य…

‘अंजीर’ मांसाहारी की शाकाहारी सुका मेवा? जाणून घ्या आहे यामागचे सत्य…

सुका मेवा म्हटला की काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड या फळांची नावे आठवतात. तसेच यात उल्लेख होतो तो ‘अंजीर’चा. हे या सुकामेव्याच्या यादीत प्रथम स्थानावर असते. अंजीर अनेकजण आवडीने खातात. मात्र जैन समाजाचे लोक अंजीर खाणे टाळतात. अजींर मांसाहारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अंजीर हे मांसाहारी की शाकाहारी असा प्रश्न सर्व अनेकदा उपस्थित होता. जाणून घेऊया यामागील सत्य…

अंजीर हे भूमध्य प्रदेश, दक्षिण आशिया आणि पश्चिम आशियातील एक फळ आहे. त्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीराची पचनक्रिया सुरळीत राहते. या फळाचा साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी वापर केला जातो. अंजीरांचे परागीभवन गांधील माशीव्दारे होते. गांधील माशीची मादी अंजीराच्या फळामध्ये अंडी घालण्यासाठी प्रवेश करतात. यादरम्यान नर माशीही फळामध्ये प्रवेश करतात. त्यानंतर मादी तेथे अंडी घालतात. यानंतर मादींना बाहेर काढण्यास नर माशी मदत करतात. मात्र, अनेकदा त्यांना बाहेर पडता येत नाही.  अंजीरमध्ये अडकल्यामुळे तिला त्यातून बाहेर पडता येत नाही आणि त्यातच तिचा मृत्यू होतो.

अंजीरमध्ये असलेले एन्झाईम माशीची मृत शरीराचे विघटन करतात आणि ते फळामध्ये मिसळतात. त्यामुळे हे फळ तयार होत असताना एका जीवाचा मृत्यू होतो. मात्र, प्रत्येक अंजारात या प्रक्रियेदरम्यान माशीचा आतमध्ये मृत्यू झाली किंवा ती बाहेर आली, हे कळण्यास मार्ग नसतो. त्यामुळे अनेकजण या फळाला मांसाहारी मानतात.

जैन धर्मात अहिंसेला खूप महत्त्व दिले गेले आहे. हा धर्म तत्वज्ञान, अहिंसा, इतर मानवांना आणि प्राण्यांना इजा पोहोचवत नाही. त्यामुळे जैन समाजाचे लोक मांसाहारी पदार्थ खात नाहीत. तसेच जमीनीखाली येणारे रताळे, बटाचेही त्यांना वर्ज्य असते. अंजीर मध्ये गांधील माशीचे काही घटक असून इतर सजीव असतात, अशी त्यांची मान्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;