महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर योगींची खुर्ची जाणार! अखिलेश यादव यांचा मोठा दावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर योगींची खुर्ची जाणार! अखिलेश यादव यांचा मोठा दावा

समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. कुंदरकी येथे एका निवडणूक सभेला सोमवारी संबोधित करताना अखिलेश यादव यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री योगी यांची खुर्ची हिसकावून घेतली जाईल असे भाकीत केले. आजचे सरकार आपली खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न आहे. दिल्लीश्वरांनी ठरवले आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर योगी यांना पायउतार व्हावे लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अखिलेश यादव यांनी कुंदरकी येथे जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांना दिल्लीला जाऊन त्यांना स्वत:साठी काहीतरी करायचे होते, पण त्यांना काहीच करता आलेले नाही. राज्यातील कायदा सुव्यवस्था अगदी सुरळीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांचे पोलीस अधिकारीच अजूनही कार्यवाहकपदी असून त्यांची स्थायी नियुक्त झालेली नाही. आता दिल्लीश्वर त्यांची खुर्ची हिसकावणार असल्याचे अखिलेश यादव म्हणाले.

खरेतर याआधीच योगींची खुर्ची जाणार होती. मात्र, आता दिल्लीश्वरांचा निर्णय झआला आङे. मी तुम्हाला आश्वासन देतो की महाराष्ट्रात भाजपचा पराभव होईल आणि  उत्तर प्रदेशातही भाजप योगींची खुर्ची काढून घेतली जाईल, असा दावा त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;