धर्मेंद्र यांचा ‘या’ गोष्टीसाठी होता विरोध, हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मला आणि मुलींना कायम….’

धर्मेंद्र यांचा ‘या’ गोष्टीसाठी होता विरोध, हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मला आणि मुलींना कायम….’

बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल म्हणजे अभिनेत्री हेमा मालिनी यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. हेमा मालिनी फक्त उत्तम अभिनेत्रीच नाही तर, भरतनाट्यम आणि कुचिपुडी डान्सर देखील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हेमा मालिनी स्वतःची नृत्य कला जोपासत आहेत. वयाच्या 76 व्या वर्षी देखील हेमा मालिनी उत्तम नृत्य सादर करत चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. हेमा मालिनी यांचं नृत्य सादर करून झाल्यानंतर असंख्य लोक त्यांचं कौतुक करतात. पण अभिनेते धर्मेंद्र यांनी आजपर्यंत हेमा मालिनी यांचं शास्त्रीय पाहिलेलं नाही. याचा खुलासा खुद्द हेमा मालिनी यांनी केला.

हेमा मालिनी म्हणाल्या, ‘धर्मेंद्र यांनी आजपर्यंत माझा एकही परफॉर्मेंस पाहिला नाही. धर्मेंद्र प्रचंड पारंपरिक आणि रुढीवादी आहे. माझे स्टेज परफॉर्मेंस प्रत्येक ठिकाणी प्रसिद्ध आणि लोकप्रिय असतात. पण धर्मेंद्र यांना माझा एकही परफॉर्मेंस पाहिला नाही. त्यांना असं वाटतं स्टेजवर असताना मी फार वेगळी दिसते. मी परफॉम करते तेव्हा त्यांची हेमा नसते… असं त्यांना वाटतं. त्यामुळे धर्मेंद्र माझ्या कार्यक्रमाला येत नाहीत.’

 

 

पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मुलींनी डान्स केलेलं देखील धर्मेंद्र यांना आवडत नव्हतं. ईशा हिला प्रोफेशनल डान्सर व्हायचं होतं. बॉलिवूडमध्ये ईशाला स्वतःची ओळख निर्माण करायची होती. पण धर्मेंद्र यांनी मुलींना डान्स आणि अभिनय करणं आवडत नव्हतं… या गोष्टींच्या ते विरोधात होते.’

‘जेव्हा त्यांना माझ्या नृत्याबद्दल कळलं, लोकं माझ्या नृत्याचं कौतुक करत आहेत कळल्यानंतर धर्मेंद्र यांनी मुलींना डान्स आणि अभिनय करण्याचा परवानगी दिली…’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या. हेमा मालिनी कायम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगत असतात.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर आजपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या मुख्य घरात प्रवेश केला नाही. लग्नानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर घेतलं आणि दुसरा संसार थाटला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;