5 वर्षांनंतर कपिल शर्माच्या शोमध्ये परतले नवज्योत सिंग सिद्धू; अर्चनाकडून नाराजी व्यक्त

5 वर्षांनंतर कपिल शर्माच्या शोमध्ये परतले नवज्योत सिंग सिद्धू; अर्चनाकडून नाराजी व्यक्त

नवज्योत सिंग सिद्धू हे तब्बल पाच वर्षांनंतर कॉमेडी कपिल शर्माच्या शोमध्ये परतले आहेत. कपिलच्या शोच्या आगामी भागाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू हे पुन्हा एकदा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधल्या त्यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसून येत आहेत. यामुळे इतक्या वर्षांपासून त्याच खुर्चीवर बसलेली अभिनेत्री अर्चना पुरण सिंग नाराज झाल्याचं पहायला मिळतंय. या टीझरमध्ये सिद्धू हे अर्चनाच्या खुर्चीवर बसलेले दिसतात आणि कॉमेडियन सुनील ग्रोवर सिद्धूंच्या वेशात त्यांच्या समोर येतो. सुनीलला आपल्याच वेशात पाहून सिद्धू म्हणतात की, “मीच खरा नवज्योत सिंग सिद्धू आहे.” यानंतर अर्चना पुरण सिंग फ्रेममध्ये येते आणि नाराज होऊन कपिलला सिद्धूंबद्दल विचारते. “कपिल, तू सरदार साहेबांना सांग की माझ्या खुर्चीवर उठा, कधीपासून ते कब्जा करून बसलेत.”

या एपिसोडमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि क्रिकेटर हरभजन सिंगसुद्धा उपस्थित होते. या एपिसोडचा टीझर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला. ‘सरदारजी इज बॅक’, ‘आम्हाला तुमची खूप आठवण आली’, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. 2013 मध्ये कलर्स टीव्हीवर जेव्हापासून कपिल शर्माचा कॉमेडी शो सुरू झाला, तेव्हापासून नवज्योत सिंग सिद्धू या शोचा भाग होते. मात्र 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यावरून केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे त्यांना हा शो सोडावा लागला होता. त्यावेळी सिद्धू म्हणाले होते, “हे (दहशतवादी हल्ला) भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे आणि मी त्याचा तीव्र निषेध करतो. हिंसा नेहमीच निषेधार्ह असते आणि ज्यांनी ती केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण मूठभर लोकांसाठी तुम्ही संपूर्ण देशाला दोष देऊ शकता का? एखाद्या व्यक्तीला तुम्ही दोष देऊ शकता का?”

नवज्योत सिंग सिद्धूंच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते. अनेकांनी त्यावेळी ‘द कपिल शर्मा शो’वर बंदी आणण्याची मागणी केली होती. ‘बॉयकॉट सिद्धू’ असा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. या वादानंतर कपिल शर्माच्या शोमध्ये सिद्धूंची जागा अर्चना पुरण सिंगने घेतली. आता सिद्धू पाच वर्षांनंतर जरी कपिलच्या शोमध्ये परतले असले तरी ते फक्त एका आठवड्यापुरतेच आले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;