तुला आता पुराच करतो बघ! मिंध्यांच्या उमेदवाराची वृद्धाला धमकी

तुला आता पुराच करतो बघ! मिंध्यांच्या उमेदवाराची वृद्धाला धमकी

कर्जत-खालापूरमधील मिंधे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे हे एकीकडे त्यांच्या मित्र पक्षांवर बरळत असतानाच आज त्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला भररस्त्यात धमकावले. तुला आता पुराच करतो.. तुला पुरा नाही केला तर नाव नाही सांगणार साल्या, अशी शिवीगाळ करत थोरवे यांनी या ज्येष्ठ नागरिकाला धमकावले. हा व्हिडीओ व्हायरल होताच मतदारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

मतदानाला अवघे नऊ दिवस शिल्लक राहिल्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. आज मिंधे गटाचे उमेदवार कडाव येथील बाल दिगंबर गणपती मंदिर परिसरात प्रचारासाठी गेले तेव्हा तेथे ज्येष्ठ नागरिक मनोहर पाटील उभे होते. पाटील हे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. थोरवे यांनी पाटील यांना हाक मारली. त्यांच्यात काही बोलाचाली झाली. मात्र अचानक थोरवेंचा पारा वाढला आणि त्यांनी थेट पाटील यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पाटील यांनी हात जोडून तुम्ही शिवीगाळ करू नका असे सांगितले. मात्र थोरवे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

असला लोकप्रतिनिधी काय कामाचा?

हा तमाशा सोशल मीडियावर टिपला जात असल्याचे थोरवेंच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी थोरवे यांची समजूत काढत त्यांना पुढे आणले. मात्र तोपर्यंत थोरवे शिवीगाळ करतच होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. जो वडिलांच्या वयाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करून त्यांचा अपमान करतो तो लोकप्रतिनिधी काय कामाचा, अशी प्रतिक्रिया कर्जतकरांमधून उमटली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;