वाढदिवसाच्या चार दिवस आधी अभिनेत्याने स्वत:ला संपवलं; कारण आलं समोर

वाढदिवसाच्या चार दिवस आधी अभिनेत्याने स्वत:ला संपवलं; कारण आलं समोर

‘स्प्लिट्सविला’ आणि ‘क्राइम पॅट्रोल’ फेम अभिनेता नितीन चौहानने टोकाचं पाऊल उचलत सर्वांना मोठा धक्का दिला. 6 नोव्हेंबर रोजी मुंबईतील गोरेगाव इथल्या राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असून त्याच्या मृत्यूमागचं कारण समोर आलं आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून काम मिळत नसल्याने नितीन नैराश्याचा सामना करत होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नितीन त्याच्या मानसिक आरोग्यासाठी उपचारसुद्धा घेत होता, असं त्याच्या पत्नीने सांगितलं आहे. “प्राथमिक चौकशीदरम्यान आम्हाला असं कळलंय की नितीनला गेल्या काही वर्षांपासून काम मिळत नव्हतं. यामुळे तो नैराश्यात होता”, अशी माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजय आफळे यांनी दिली. नितीनने तीन वर्षांपूर्वी सब टीव्हीवरील ‘तेरा यार हूँ मै’ या मालिकेत शेवटचं काम केलं होतं.

संघर्षाच्या काळात नितीनने छोटा व्यवसाय करण्याचाही प्रयत्न केला होता. त्याने आईस्क्रीमची फ्रँचाइजी उघडली होती. मात्र या व्यवसायातही त्याला अपयश मिळालं. नितीन त्याच्या पत्नी आणि मुलीसोबत गोरेगावमध्ये राहत होता. गुरुवारी संध्याकाळी त्याची पत्नी आणि मुलगी सोसायटीच्या पार्कात फिरायला गेले असता नितीनने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. पत्नी आणि मुलगी जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातही त्यांना अपयश आलं. अखेर त्यांनी आजूबाजूच्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नितीन त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

दिंडोशी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असून नितीनच्या शवविच्छेदनाच्या अहवालाची त्यांना प्रतीक्षा आहे. 35 वर्षीय नितीनने ‘दादागिरी 2’ हा रिॲलिटी शो जिंकला होता. मूळचा उत्तरप्रदेशमधील अलिगड इथला नितीन हा या शोनंतर प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर त्याने विविध मालिका आणि शोजमध्ये आपल्या दमदार अभिनयाची, प्रतिभेची चुणूक दाखवली. तो ‘एमटीव्ही स्पिट्सव्हिला 5’मध्येही झळकला होता. त्याचसोबत ‘जिंदगी डॉट कॉम’, ‘क्राइम पेट्रोल’, ‘फ्रेंड्स’ यांसारख्या सीरिजमध्येही त्याने काम केलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;