सैफ – करीना यांच्या जीवाला धोका? अभिनेता म्हणाला, ‘आमच्या घराजवळ बॉम्बस्फोट…’

सैफ – करीना यांच्या जीवाला धोका? अभिनेता म्हणाला, ‘आमच्या घराजवळ बॉम्बस्फोट…’

Saif Ali Khan – Kareena Kapoor: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही. दोघांनी देखील दमदार भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं आहे. आज करीना – सैफ त्यांच्या दोन मुलांसोबत आणि कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. पण एक दिवस असा होता जेव्हा सैफ – करीना यांनी धमक्या मिळाल्या होत्या. त्यामागे कारण देखील फार मोठं आहे. सैफ – करीना यांनी आंतरधर्मीय विवाहामुळे धमक्या मिळाल्या होत्या. या घटनेचा खुलासा खुद्द सैफने एका मुलाखतीत केला होता.

सांगायचं झालं तर, सैफ – करीना यांच्या लग्नाला अनेकांचा विरोध होता. सैफसोबत लग्न करु नकोस… असा सल्ला देखील करीनाला अनेकांनी दिला. पण कोणत्याच गोष्टीकडे लक्ष केंद्रीत न करता सैफ – करीना यांनी स्वतःच्या भावनांना महत्त्व दिलं आणि ऑक्टोर 2012 मध्ये लग्न केलं. लग्न झाल्यानंतर अभिनेत्याला धमक्या येवू लागल्या.

 

 

एका मुलाखतीत सैफ अली खान म्हणाला, ‘अनेक जण आमच्या लग्नाच्या विरोधात होते. माझे सासरे म्हणजे रणधीर कपूर यांनी निनावी पत्र आलं होतं. पत्रात आमच्या कुटुंबाला जीवे मारण्याची आणि आमच्या घराजवळ बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली. पण याचा आम्हाला फारसा त्रास झाला नाही. यापूर्वी देखील कुटुंबाने अशा धमक्यांचा सामना केला आहे.’

‘लोकं आमच्याबद्दल काय विचार करतात याबद्दल मी कधीच विचार करत नाही. धमक्या देणं आणि दिलेल्या धमक्या सत्यात उतरवणं यामध्ये फार फरक आहे. माझ्या आई – वडिलांनी देखील आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे त्यांना देखील अशा धमक्या आल्या होत्या…’ असं सैफ अली खान मुलाखतीत म्हणाला.

सैफ अली खान याच्या आई – वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांनी देखील आंतरधर्मीय लग्न केलं होतं. सैफ – करीना यांनी देखील फार कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सैफ अली खान याच्यासोबत 2012 मध्ये लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने 2016 मध्ये पहिला मुलगा तैमूर अली खान याला जन्म दिला. त्यानंतर 2021 मध्ये करीना हिने दुसरा मुलगा जेह अली खान याला जन्म दिला. आता अभिनेत्री कायम मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;