अजित पवारांची चौकशी थांबवली नाही -जावडेकर
राज्यात तब्बल 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केल्याप्रकरणी अजित पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोप केला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून भाजपसोबत आले. त्यानंतर त्यांना थेट उपमुख्यमंत्री करण्यात आले. या प्रश्नावर भाजपचे नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांची चौकशी थांबविण्यात आलेली नाही, असा दावा केला.
भाजप मीडिया कक्षात आयोजित पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नोत्तरात जावडेकरांची भंबेरी उडाल्याचे दिसून आले. अवघ्या साडेतीन मिनिटात त्यांनी प्रश्नोत्तरे थांबवित पत्रकार परिषद गुंडाळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यावर आरोप केले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List