लाल रंगाचे संविधान हाती घेतले आहे, अटक करून दाखवा

लाल रंगाचे संविधान हाती घेतले आहे, अटक करून दाखवा

लाल रंगाचे संविधान हाती घेणाऱ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादी ठरवले आहे. मी मात्र देशासाठी लाल रंगाचे संविधान हाती घेतले असून फडणवीस यांनी मला अटक करून दाखवावी, असे खुले आव्हान आज खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. उल्हासनगर विधानसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उमेदवार ओमी कलानी यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

राहुल गांधी यांनी हाती लाल रंगाचे संविधान घेतल्याकर देवेंद्र  फडणवीस यांना नक्षलवाद दिसला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आजच्या प्रचार सभेत लाल रंगाचे संविधान हातात घेऊन भाजप आणि फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर दिले. लाल रंगाचे संविधान हाती घेतले म्हणून मी नक्षलवादी झाली का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. यावर सभेतून नाही… नाही असा आवाज घुमला. जर फडणवीसांना मी नक्षलवादी काटते तर त्यांनी मला अटक करून दाखवावी, असे आव्हानच सुळे यांनी दिले. यावेळी त्यांनी सर्व समाजघटकांच्या विकासासाठी महाविकास आघाडीला निवडून देण्याचे आवाहनही केले. महिला स्वाभिमान प्रचार सभेला महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती.

भाजपमुळे समाजात तेढ

फेक नरेटिव्हबाबत फडणवीस यांचा कुणी हात धरू शकत नाही. बुद्धिभेद करून समाज, जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सातत्याने भाजपने केले आहे. मात्र या फसवणुकीला जनता बळी पडणार नाही, असा विश्वासही यावेळी खासदार सुप्रिया सुळे त्यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;