जामीनाच्या निर्णयातील विलंबामुळे मूलभूत अधिकारांवर गदा; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

जामीनाच्या निर्णयातील विलंबामुळे मूलभूत अधिकारांवर गदा; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

फौजदारी खटल्यांतील आरोपींच्या जामीन अर्जांवर वर्षांनुवर्षे सुनावणी पूर्ण होत नसल्याच्या वस्तुस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. अशा जामीनाच्या प्रकरणांत निर्णय देण्यातील एक दिवसाचाही विलंब नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर प्रतिकूल परिणाम करतो. निर्णयातील विलंबाने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येते, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. वी. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने केली.

देशभरात अनेक कच्चे कैदी जामीन अर्जावरील निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्या अर्जावरील सुनावणीला गती देणारी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार व्यक्तीगत स्वातंत्र्याच्या महत्त्व जोर दिला आहे. जामीन अर्ज कित्येक वर्षे प्रलंबित ठेवण्याची प्रथा आम्हाला मान्य नाही, असे न्यायमूर्ती गवई यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

इलाहाबाद येथील व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याचिकाकर्त्या व्यक्तीचा जामीन अर्ज गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून इलाहाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्या अर्जावर काहीच प्रगती झालेली नाही. कुठल्याही प्रभावी जामीन अर्जावर केवळ तारखा पडत आहेत. याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आणि उच्च न्यायालयाला दोन आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;