जया बच्चन यांनी लग्नाआधी ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांना दिली होती चेतावणी

जया बच्चन यांनी लग्नाआधी ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांना दिली होती चेतावणी

Aishwarya Rai Bachchan: आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी जोडीदारासोबत घटस्फोट घेत नातं संपवलं. सेलिब्रिटी जोडप्यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. पण आता अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना, दोघे खरंच विभक्त होत आहेत का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. लग्नाच्या 17 वर्षांनंतर ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

काही मीडियारिपोर्टनुसार, ऐश्वर्या आता सासरच्या मंडळींसोबत ‘जलसा’ बंगल्यात राहत नाही. दोघांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 2007 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण लग्न करण्याआधी अभिनेत्री जया बच्चन यांनी दोघांना देखील चेतावणी दिली होती.

जया बच्चन यांनी ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये मोठा खुलासा केला होता. जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी बच्चन कुटुंबातील होणाऱ्या सूनेबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. करणने विचारलं होतं, ‘ऐश्वर्या – अभिषेक यांना लग्नासाठी कोणता सल्ला द्याल…’

 

 

यावर जया बच्चन म्हणाल्या, ‘एवढाच सल्ला देईल की गैरवर्तन आणि एकमेकांना वाईट वागणूक दिली की गोष्टी बिघडतील…’ एवढंच नाही तर, श्वेता हिने देखील ऐश्वर्या हिचं कौतुक केलं होतं. ‘ऐश्वर्या हिला कोणत्याच सल्ल्याची गरज नाही… ‘

‘ऐश्वर्या मध्ये प्रचंड धौर्य आहे आणि हिच गोष्ट तिला आयुष्यात फार पुढे घेऊन जाईल…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती. शिवाय ऐश्वर्या हिला मी माझी सून नाही तर, मुलगी मानते असं देखील जया बच्चन म्हणाल्या होत्या.

जया बच्चन म्हणाल्या होत्या, ‘अमिताब बच्चन देखील ऐश्वर्या हिला सून मानत नाहीत. श्वेता घरी आल्यानंतर अमिताभ यांना जेवढा आनंद होतो. तेवढाच आनंद ऐश्वर्या आल्यानंतर देखील होतो…’ असं देखील जया बच्चन पूर्वी म्हणाल्या होत्या.

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिषेक – ऐश्वर्या यांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न झालं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. पण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;