‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री धक्कादायक वक्तव्य, ‘आता प्रेग्नेंट होईल, आयुष्य उद्ध्वस्त…’

‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री धक्कादायक वक्तव्य, ‘आता प्रेग्नेंट होईल, आयुष्य उद्ध्वस्त…’

Balika Vadhu fame Avika Gor: ‘बालिका वधू‘ (Balika Vadhu) मालिकेतून लहान वयात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) आता तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत अविका हिने स्वतःच्या प्रेग्नेंसीबद्दल मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली. सांगायच झालं तर, मालिकेमुळे अविका हिचं बालपन सेटवर गेलं. पण मालिकेमुळे अविका हिला अनेक गोष्टी कळू लागल्या. मासिक पाळीबद्दल देखील अविका हिने सांगितलं होतं. शिवाय प्रेग्नेंसीबद्दल देखील अविकाला काहीही माहिती नव्हतं. अशात असं काही झालं ज्यामुळे अविका हिला प्रचंड भीती वाटू लागली.

मुलाखतीत अविका हिने मोठा खुलासा केला. ‘सेक्स एज्युकेशनबद्दल टीचरने चांगल्या प्रकारे समजावलं होतं. शिवाय मनात संकोश असेल तर, लिहून जे काही विचारायचं आहे ते विचारा… असं देखील त्या म्हणाल्या. ज्यामुळे मोठी मदत झाली.’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

 

पुढे अविका म्हणाली, ‘मुल कसं जन्माला येतं हे देखील मला माहिती नव्हतं. मझ्या लक्षात आहे मी लहान होती आणि कधी – कधी बोलताना थुंकी उडते. अशात कोणाची थुंकी उडाली आणि माझ्या तोंडाजवळ आली. तेव्हा मला वाटू लागलं मी आता प्रग्नेंट होणार आणि माझ्या आयुष्य उद्ध्वस्त होणार… पण हळू – हळू मला गोष्टी कळत गेल्या…’ असं म्हणत अभिनेत्री लहानपणी मनात येणाऱ्या प्रश्नांबद्दल सांगितलं.

अविका कोणाला करत आहे डेट?

अविका गेल्या चार वर्षांपासून मिलिंद चंदवानी याला डेट करत आहे. मिलिंद चंदवानी इंडस्ट्रीमधील नाही. आता फक्त 26 वर्षांची असून मिलिंद 32 वर्षांचा आहे. अविका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

सांगायचं झालं तर, मिलिंद चंदवानी याला डेट करण्यापूर्वी अविका हिच्या नावाची चर्चा तिच्यापेक्षा 18 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रंगू लागली. ‘सुसराल सिमर का’ मालिकेतील अभिनेता मनिष रायसिंगन याच्यासोबत अविका हिच्या नात्याच्या तुफान चर्चा रंगल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;