रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा झंझावात, 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या तोफा धडाडणार

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा झंझावात, 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या तोफा धडाडणार

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू असून महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. दि.13 नोव्हेंबर रोजी शिवसेना नेते,आमदार भास्कर जाधव यांच्या जाहिर सभा तर 14 नोव्हेंबर रोजी शिवसेना नेते,माजी खासदार विनायक राऊत यांच्या जाहिर सभा होणार आहेत.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने निवडणूक लढवत आहे.बाळ माने यांना जनतेतून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.पुढील दोन दिवस रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. दि.13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता कर्ला येथे शिवसेना नेते,आमदार भास्कर जाधव यांची जाहिर सभा होणार आहे.त्यानंतर दुपारी 1 वाजता वाटद येथील जाहिर सभेत शिवसेना नेते,आमदार भास्कर जाधव मार्गदर्शन करणार आहेत.दि.14 नोव्हेंबर रोजी शिवसेना नेते , माजी खासदार विनायक राऊत यांच्या जाहिर सभा होणार आहेत. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता बसणी येथे बैठक होणार आहे. दुपारी 12 वाजता मिरजोळे येथे बैठक, दुपारी 3 वाजता रत्नागिरी शहरात बैठक,सायंकाळी आंबेशेत येथे बैठक आणि साडे सात वाजता सोमेश्वर मोहल्ला येथे बैठक होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;