जागृत नागरिक होऊ या, अभिमानाने मत देऊ या; मतदान जनजागृती रत्नागिरीत मॅरेथॉन

जागृत नागरिक होऊ या, अभिमानाने मत देऊ या; मतदान जनजागृती रत्नागिरीत मॅरेथॉन

रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी रविवारी मॅरेथॉन काढण्यात आली. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान वाढविण्यासाठी सर्वांनी ब्रँड अम्बेसिडर म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी रविवारी मॅरेथॉन काढण्यात आली.

पोलीस मैदान येथून सुरु झालेल्या या मॅरेथॉनला जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ज्येष्ठ नागरिक अविनाश फडके, प्रातांधिकारी जीवन देसाई, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, पोलीस उपअधिक्षक निलेश माईंनकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. परंतु, मतदान कमी होत असते. त्यामुळे सर्वांनी ब्रँड अम्बेसिडर म्हणून काम करावे आणि मतदार जनजागृती करावी. समाज माध्यमांवर त्याबाबत स्टेटस लावावेत. आपल्या जिल्ह्याचे जास्तीत जास्त मतदान होईल, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत.

पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे. मतदानाचे हे पवित्र काम आहे. ते सर्वांकडून व्हावे. तरच लोकशाही आणखी बळकट होईल. सर्वांनी आपल्या भागातील नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करावे. मोठ्या संख्येने सहभागी होऊन निवडणुकीचे पवित्र काम करावे. सुरुवातीला फलकावर स्वाक्षरी करुन स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी शपथ घेतली. या ठिकाणाहून सुरुवात झालेली मॅरेथान जयस्तंभ मार्गे भाट्ये बीच येथे पोहचली. तेथे सांगता करण्यात आली. मॕरेथॉन कोस्टल, मॕरेथॉन फथक, सायकल आसोसिएशन, पोलीस, अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;