भरधाव ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू

वाशिम-शेलुबाजार मार्गावर भरधाव ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने अपघात घडला. या अपघातात एकाच गावातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. बाळू लगड आणि डिगंबर देशमुख अशी मयतांची नावे आहेत. दोघांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

काटा गावातील डिगंबर देशमुख हे दुचाकीवरून वाशिमकडे चालले होते. तर बाळू लगड हे वाशिमहून काटा गावाकडे येत होते. दोघेही भरधाव वेगाने येत होते. यादरम्यान वाशिम-शेलुबाजार मार्गावर दोघांची वाहनांची समोरासमोर धडक झाली.

धडक होताच दुचाकीवरील डिगंबर हे रस्त्यावर लांब फेकले गेले. यात जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर धडक होताच ट्रॅक्टर पलटी झाला आणि चालक बाळू हे ट्रॅक्टरखाली दबले जाऊन त्यांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;