“घरातल्या क्लेशामुळे 13 व्या वर्षापासूनच ड्रग्ज..”; स्मिता पाटील-राज बब्बरच्या मुलाचा खुलासा

“घरातल्या क्लेशामुळे 13 व्या वर्षापासूनच ड्रग्ज..”; स्मिता पाटील-राज बब्बरच्या मुलाचा खुलासा

झगमगत्या बॉलिवूड विश्वात प्रत्येकजण इथल्या ग्लॅमरसाठी ओळखला जातो. मात्र याच फिल्म इंडस्ट्रीची दुसरी काळी बाजूही आहे. अनेकदा इथले कलाकार वाईट सवयींच्या, व्यसनांच्या अधीन होतात. यामुळे अनेक कलाकारांचं करिअर उद्ध्वस्त झालंय. असंच एक नाव म्हणजे अभिनेता प्रतीक बब्बर. ड्रग्जच्या व्यसनामुळे प्रतीक नेहमीच चर्चेत राहिला आहे. प्रतीक इंडस्ट्रीत आल्यानंतर ड्रग्जच्या आहारी गेल्याचं म्हटलं जातं. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतीकने स्पष्ट केलंय की चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याच्या खूप आधीपासून त्याला ड्रग्जचं व्यसन होतं.

बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यापासून प्रतीक अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचं म्हटलं जातं. चित्रपटांमध्ये काम मिळू लागल्यानंतर प्रसिद्धीचा वाईट परिणाम त्याच्यावर झाला आणि त्याने ड्रग्जचं सेवन करण्यास सुरुवात केली, अशी चर्चा होती. मात्र आता खुद्द प्रतीकने या सर्व चर्चांना पूर्णविराम देत धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की वयाच्या तेराव्या वर्षापासून त्याला ड्रग्जचं व्यसन होतं. किंबहुना त्यापूर्वी काही काळ तो या वाईट सवयींच्या आहारी गेला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Banerjee (@priyabanerjee)

प्रतीकने खुलासा केला की त्याचं ड्रग्जच्या आहारी जाण्यामागचं कारण फिल्म इंडस्ट्री नव्हती, तर त्याच्या घरातील परिस्थिती होती. ‘बॉलिवूड बबल’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत प्रतीक म्हणाला, “लोकांना असं वाटतं की, अरे हा जेव्हा फिल्म इंडस्ट्रीत काम करू लागला, याच्याकडे पैसे आले, प्रसिद्धी मिळाली तेव्हापासून हा ड्रग्जच्या आहारी गेला. नाही, हे खरं नाही. मी तेरा वर्षांचा असल्यापासूनच ड्रग्ज सेवन करत होतो. किंबहुना वयाच्या 12 व्या वर्षीच मला ड्रग्ज घ्यायची सवय लागली होती. होय, मी प्रचंड घाबरलेलो होतो. त्यामुळे हे सर्व फिल्म इंडस्ट्रीमुळे झालं नाही. दुर्दैवाने माझं संगोपन खूप वेगळ्या पद्धतीने झालं आणि माझी कौटुंबिक फार गुंतागुंतीची होती. म्हणून मी ड्रग्जचं सेवन करू लागलो होतो. पैसा आणि प्रसिद्धीमुळे मी त्यांच्या आहारी गेलो नव्हतो. त्याच्याही आधी मला ते व्यसन होतं.”

प्रतीक हा दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा आहे. “ड्रग्ज हे ट्रॉमाशी संबंधित आहे, हे तुम्ही समजायला हवं. जोपर्यंत तो ट्रॉमा तुमच्या डोक्यातून जात नाही, तोपर्यंत त्याचा परिणाम तुमच्या नात्यांवर आणि आयुष्यातील इतर गोष्टींवर होत राहणार. पण एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला गोष्टी चांगल्या ठेवण्यासाठी स्वत:वर काम करावं लागतं. मी हेच गेल्या काही वर्षांपासून करतोय. यात माझी होणारी पत्नी खूप मदत करतेय”, असं प्रतीकने स्पष्ट केलं. प्रतीकने यावर्षी प्रिया बॅनर्जीशी साखरपुडा केला. तो लवकरच सलमानच्या आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;