‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये ट्विस्ट; अप्पी-अर्जुनच्या नात्याचं सत्य कळल्यावर अमोल काय करेल?
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अमोलला दिवाळीत आनंदित ठेवण्यासाठी संपूर्ण कुटुंब प्रयत्न करतंय. अमोलच्या मन:शांतीसाठी अमोलला झालेल्या आजाराचं सत्य लपवण्याचा निर्णय स्वप्नील आणि रुपालीने घेतलाय.
दिवाळीच्या तयारीत सगळे असतानाच दीप्या अमोलच्या आजाराचं सत्य सर्वांसमोर मांडतो. हे ऐकून सगळे हादरतात. रुपाली आणि तिच्या कुटुंबाला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतात. अमोल त्यांना समर्थन देत सांगतो की, हे सत्य लपवण्यामागे त्यांचा हेतू चांगला होता.
ज्यामुळे अर्जुन आणि अप्पी त्यांच्या नात्याबद्दल पुन्हा विचार करतात. कुटुंबातील या वादानंतर अमोल सगळ्यांना दिवाळीसाठी एकत्र आणतो आणि कामाची विभागणी करतो.
बापू आणि विनायक यांना यामुळे थोडी आशा वाटतेय. पण तरीही अप्पी आणि रुपाली यांच्यातील तणाव काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दिवाळीच्या सकाळी अमोल सर्वांना उठवून तयारीसाठी एकत्र करतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List