महाराष्ट्रात चोरांचे सरकार, त्यांचे सरदार दिल्लीत बसलेत; संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्रात चोरांचे सरकार, त्यांचे सरदार दिल्लीत बसलेत; संजय राऊत यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रात डेरा टाकला आहे, राज्यात चोरांचे सरकार असून त्यांचे सरदार दिल्लीत बसले आहेत अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.

आज मुंबईत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित झाला. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात चोरांचे सरकार सुरू आहे. या चोरांचे सरदार दिल्लीत बसले आहेत. महाराष्ट्रनामाचा एकच हेतू आहे तो म्हणजे या महाराष्ट्र चोरांना इथून हटवा मग दिल्लीच्या चोरांना हटवा. महाराष्ट्र हे स्वाभिमानी महाराष्ट्र राहिलेले आहे. छत्रपती शिवाजी महारांजाशी महाराष्ट्राशी नाव जोडलेलं आहे. महाराष्ट्र हा कधीच गुलाम होणार नाही आणि महाराष्ट्र कुणाची गुलामी करणार. महाराष्ट्रनामात जे काही म्हटलं आहे ते स्वाभिमानाबद्दल म्हटलंय. आम्ही आमच्या पायांवर उभे राहू. आम्ही तुमची गुलामी नाही करणार असे संजय राऊत म्हणाले.

तसेच अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात डेरा टाकला आहे. हे लोक दिल्लीत कधी जातात हे माहित नाही. त्यांनी नवीन नारा दिला आहे एक है तो सेफ हे. म्हणून आम्ही म्हटलं की मोदींनी महाराष्ट्रात येऊ येऊ नये नाहीतर आम्ही अनसेफ होऊन जातो. हा महाराष्ट्रनामा त्यासाठीच आहे. जाहीरनामा तयार करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, समाजवादी पक्ष, आरपीआय (गवई गट) इतर मित्रपक्षांनी सहकार्य केलेले आहे,त्यांचे आभार संजय राऊत यांनी मानले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;