नीलम कोठारीचा पहिला नवरा आहे तरी कोण? मुलीला सावत्र बापाबद्दल कळताच…, फार कमी लोकांना माहितीये सत्य

नीलम कोठारीचा पहिला नवरा आहे तरी कोण? मुलीला सावत्र बापाबद्दल कळताच…, फार कमी लोकांना माहितीये सत्य

अभिनेत्री नीलम कोठारी आता बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 90 च्या दशकात अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये काम केल्यानंतर नीलम हिने मोठ्या पडद्याचा निरोप घेतला. अखेर अनेक वर्षांनंतर नीलम ‘फैबुलस लाइफ ऑफ बॉलीवुड वाइव्स’ शोमध्ये दिसली. शोमध्ये अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहे. ज्यामुळे अभिनेत्रीबद्दल माहिती नसलेल्या अनेक गोष्टी चाहत्यांपर्यंत पोहोचल्या.

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कसम’ सिनेमानंतर कोणत्याच सिनेमात अभिनेत्री दिसली नाही. लग्नानंतर तर अभिनेत्री परदेशात गेली. नीलम हिचं पहिलं लग्न उद्योजक ऋशी सेठिया याच्यासोबत झालं होतं. ज्यामुळे अभिनेत्रीला अभिनयाचा निरोप घ्यावा लागला. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

‘हम साथ साथ है’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर नीलम हिने ऋषी याच्यासोबत लग्न केलं. बँकॉक मध्ये मोठ्या थाटात दोघांचं लग्न झालं. 2002 मध्ये नीलम हिने ऋषी यांच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या दोन वर्षामध्येच नीलम – ऋषी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांचा घटस्फोट झाला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Neelam (@neelamkotharisoni)

 

पहिल्या घटस्फोटानंतर पुन्हा नीलम हिच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली. अभिनेता समीर सोनी याच्या प्रेमात अभिनेत्री होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर समीर आणि नीलम यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2011 मध्ये समीर – नीलम यांनी लग्न केलं आणि 2013 मध्ये एका मुलीला दत्तक घेतलं. दोघांनी त्यांच्या मुलीचं नाव ‘आहना’ ठेवलं आहे. पण नीलम हिने कधीच तिच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल सांगितलं नाही.

नीलम कोठारी हिच्या मुलीला घटस्फोटाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून कळलं. ज्यामुळे अभिनेत्रीच्या मुलीला मोठा धक्का बसला. नीलमच्या मित्रांनी इंटरनेटवर अभिनेत्रीबद्दल सर्च केलं, त्यानंतर आहना हिला आईच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल कळलं.

कोण आहे ऋषी सेठिया?

ऋषी सेठिया हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत आशियाई कुटुंबांपैकी एक आहे. ते उद्योगपती निर्मल कुमार सेठिया यांचे पुत्र आहेत. त्याचं कुटुंब 1969 मध्ये लंडनला गेलं, जिथे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्याचा स्वतःचा लक्झरी टी-ब्रँड, जगभरात अनेक पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. त्यांची संपत्ती 6.5 बिलियन म्हणजे भारतीय चलनानुसार 65,000 कोटी रुपयांची त्यांची संपत्ती आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;