घराचं भाडं भरण्यासाठी अभिनेत्रीकडे नव्हते पैसे, आज आहे 2700 कोटी रुपयांची मालकीण

घराचं भाडं भरण्यासाठी अभिनेत्रीकडे नव्हते पैसे, आज आहे 2700 कोटी रुपयांची मालकीण

Bollywood Actress: झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्याची इच्छा अनेकांची असते. ज्यासाठी कलाकार प्रचंड मेहनत करतात. पण इंडस्ट्रीमध्ये मेहनतीसोबतच नशिबाची साथ देखील लागते. मायानगरीत अनेक जण स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. पण सर्वांचे स्वप्न पूर्ण होत नाहीत. अखेर असे कलाकार माघार घेतात आणि घरी परततात. पण काही मात्र जिद्द मनात ठेवून जे स्वप्न पाहिलं आहे ते स्वप्न पूर्ण करतात. बॉलिवूडच्या एका अभिनेत्री सोबत देखील असंच झालं आहे. आज ती अभिनेत्री कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.

सध्या ज्या अभिनेत्री चर्चा रंगली आहे, त्या अभिनेत्रीकडे एकेकाळी घराचं भाडं भरायला देखील पैसे नव्हते. आज तिच अभिनेत्री एक दोन कोटी नाही तर, तब्बल 2700 कोटी रुपयांची मालकीण आहे. अभिनेत्री कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगत आहे. अनेक वर्ष एकापेक्षा सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री शर्मिला टागोर आहे. 65 वर्षांच्या शर्मिला टागोर यांनी त्यांच्या करियरमध्ये तब्बल 90 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं. शर्मिला यांनी अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे.

राजेश खन्ना, शम्मी कपूर, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांसारख्या अभिनेत्यांसोबत शर्मिला टागोर यांनी सिनेमांमध्ये काम केलं. तर अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत शर्मिला यांची जोडी हीट ठरली. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. आजही त्या कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

वयाच्या 13 व्या वर्षी शर्मिला यांनी केली अभिनयाला सुरुवात

वयाच्या 13 व्या वर्षी शर्मिला टागोर यांनी अभिनयाला सुरुवात केली. ‘अराधना’, ‘अमर प्रेम’, ‘दाग’, ‘मौसम’, ‘अनुपमा’, ‘एन ईवनिंग इन पेरिस’, ‘चुपके चुपके’ हे सिनेमे शर्मिला यांचे ब्लॉकबस्टर सिनेमे ठरले. ‘अराधना’ सिनेमात तर तब्बल 50 आठवडे मोठ्या पडद्यावर कमाई करत होता.

शर्मिला टागोर यांची संपत्ती

शर्मिला टागोर यांनी त्यांच्या करियरमध्ये गोल्डन टाईम अनुभवला आहे. तेव्हा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत शर्मिला टागोर अव्वल स्थानी होत्या. पण त्यांनी एक काळ असा देखील पाहिला आहे, जेव्हा त्यांच्याकडे घराचं भाडं देण्यासाठी देखील पैसे नव्हते. अशात भाडं भरण्यासाठी त्यांनी सिनेमांमध्ये काम करणं सुरु केलं. रिपोर्टनुसार आज शर्मिला टागोर यांच्याकडे जवळपास 2700 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;